दही हंडी - जय भारत सेवा संघ, चित्र आभार: विकीपिडीया |
दही हंडी फोडण्यासाठी पिरॅमिड्स बांधताना गोविंदांनी घ्यायची काळजी: अपघातांच्या अभ्यासातून केलेले निदान
पुराणकथांमधून समाजाला जगण्याचं सार गोष्टीरुपात शिकवलं जात असे. त्यामुळे ऐकणारा आपल्या कुवतीनुसार त्यातून अर्थ काढून रमत असे. सण, उत्सव यांचा हेतू या साराची उजळणी करण्यासाठी आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दही चोरण्याची कथाही अशीच आपल्याला समाजात कसं जगावं याचं दर्शन घडवते. कृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात जरी झाला असला तरी त्याचं बालपण गोकुळात गोपींच्या सान्निध्यात त्यांच्याशी खेळत, त्यांच्या खोड्या काढत गेलं. त्यांनी शिंक्याला बांधलेलं दही, लोणी चोरून खाणं ही गोष्ट रंगवून सांगितली जाते. इतक्या उंचावर बांधलेलं दही हा एकटा खाणार तरी कसा? तर त्याच्या सवंगड्यांना बरोबर घेऊन. एकमेकाच्या खांद्यावर उभं रहात ते दह्यापर्यंत पोहोचत आणि आनंद लुटत. सवंगडी वेगवेगळ्या जातीतले, परिवारातले. ध्येय साध्य करायचं असेल तर त्यांच्यात भेदभाव करून चालणार नाही ही यातून मिळणारी शिकवण. तसंच लोणी, दही हे स्निग्ध पदार्थ. शिंक्याला बांधलेल्या या पदार्थांचा हंडी फोडल्यावर सगळ्यांच्या अंगावर वर्षाव होई आणि एकमेकात स्नेह कसा निर्माण करायचा हे यातून कळे.
पुराणकथांमधून समाजाला जगण्याचं सार गोष्टीरुपात शिकवलं जात असे. त्यामुळे ऐकणारा आपल्या कुवतीनुसार त्यातून अर्थ काढून रमत असे. सण, उत्सव यांचा हेतू या साराची उजळणी करण्यासाठी आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दही चोरण्याची कथाही अशीच आपल्याला समाजात कसं जगावं याचं दर्शन घडवते. कृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात जरी झाला असला तरी त्याचं बालपण गोकुळात गोपींच्या सान्निध्यात त्यांच्याशी खेळत, त्यांच्या खोड्या काढत गेलं. त्यांनी शिंक्याला बांधलेलं दही, लोणी चोरून खाणं ही गोष्ट रंगवून सांगितली जाते. इतक्या उंचावर बांधलेलं दही हा एकटा खाणार तरी कसा? तर त्याच्या सवंगड्यांना बरोबर घेऊन. एकमेकाच्या खांद्यावर उभं रहात ते दह्यापर्यंत पोहोचत आणि आनंद लुटत. सवंगडी वेगवेगळ्या जातीतले, परिवारातले. ध्येय साध्य करायचं असेल तर त्यांच्यात भेदभाव करून चालणार नाही ही यातून मिळणारी शिकवण. तसंच लोणी, दही हे स्निग्ध पदार्थ. शिंक्याला बांधलेल्या या पदार्थांचा हंडी फोडल्यावर सगळ्यांच्या अंगावर वर्षाव होई आणि एकमेकात स्नेह कसा निर्माण करायचा हे यातून कळे.
कृष्णाच्या
दही चोरण्याच्या
कथेवर गिरगावातील
पाठारे
प्रभुंनी
कृष्ण
जन्माष्टमीच्या
दिवशी अठराव्या
शतकाच्या
मध्यात मुंबई,
ठाणे
आणि आसपासच्या
भागात दहीहंडी
लावून हा
सण साजरा
करण्यास
सुरुवात केली
असं विकीपिडीयावर या
संबंधी
दिलेल्या
विस्तृत
माहितीत
म्हणलं आहे.
यात
भाग घेणारे
पथक, ज्यांना
गोविंदा
असंही म्हणलं
जातं, मानवी
पिरॅमिड बनवत
उंचावर
बांधलेल्या
हंडीतील दही
आणि फळांचा
समाचार घेत
(आणि
आता त्याबरोबर
लाखाची बक्षिसं
घेत) पुढे
जात असतात.
किमान
पन्नास जण
तरी प्रत्येक
पथकात असतातच.
सांघिक
कार्य, सुदृढ
शरीर, चापल्य,
मनाची
एकाग्रता
याचा सुंदर
मिलाफ या
खेळात भाग
घेणाऱ्याला
प्रेरक ठरतोच
पण तो
बघणाऱ्यालाही
भावतो. तसं
पाहिलं तर
हा खेळ
ही मुंबई
आणि आसपासच्या
परिसराची
मक्तेदारीच. हिन्दी
सिनेमातून
याची माहिती
सर्वांना
मिळाली असावी
आणि तो
मुंबईबाहेर
लोकप्रिय
झाला म्हणायला
वाव आहे.
अद्यापही
खेळाडू बदलले
असले तरी
अशाच प्रकारे
मुंबईतच
जन्माष्टमी
साजरी केली
जाते तर
भारताच्या
इतर भागात
जन्माष्टमी
वेगवेगळ्या
पध्दतीनं
साजरी होते.
दिवसेंदिवस
हा खेळ
त्यात राजकारण
आणि अर्थकारण
आल्यामुळे
इतका आव्हानात्मक
बनतोय की
पिरॅमिड
बनवताना आणि
उतरवताना
होणारे अपघात
हा काळजीचा
विषय ठरावा.
२०१०
साली दहीहंडी
साजरी करताना
झालेल्या
अपघातांवर
नेमाडे, वाडे
आणि पटवर्धन
या परळ
येथील केईएमच्या
अस्थिरोगशास्त्र
विभागातल्या
डॉक्टरांच्या
चमूने सांख्यिकीय
आधारसामग्री
गोळा करून
काही निष्कर्ष
गेल्या वर्षी
एका वैज्ञानिक
नियतकालिकात
(Journal of Postgraduate Medicine 58(4); 262-)
प्रकाशित
केले ते
विचार
करण्यासारखे
आहेत. त्यातील
माहितीचा
हा आढावा.
२०१०
साली केईएम
मध्ये
जन्माष्टमीच्या
दिवशी दहीहंडी
खेळणाऱ्या
एकूण १२४
गोविंदांवर
उपचार केले
गेले. त्यातील
सुमारे ७०
टक्के १५-३०
या वयोगटातील
तर १९
टक्के ३०
वर्षांवरील
आणि ११
टक्के १५
वर्षांखालील
वयोगटातील
आढळले. १०
वर्षांखालील
दोन लहान
मुलींव्यतिरिक्त
सगळेच पुरुष
होते. सरत्या
दिवसागणिक
दुखापतींमध्ये
वाढ झाल्याचे
त्यांच्या
निदर्शनास
आले. सुमारे
११% गोविंदांना
माध्यान्हापूर्वीच तर
३३% दुपारी
आणि सायंकाळच्या
सहानंतर ५६%
गोविंदांना
दुखापती
झाल्या. पिरॅमिडच्या
मधल्या थरातील
गोविंदांना
दुखापती
होण्याचं
प्रमाण
सर्वाधिक
असल्याचं
दिसतं. त्यांच्यातील
दुसऱ्या ते
चवथ्या थरातील
गोविंदांचा
दुखापती
होण्याचा
वाटा सुमारे
अर्ध्याहून
अधिक (५२%)
होता.
तसंच
पिरॅमिड
उतरवताना
दुखापती
होण्याचं
प्रमाण विचार
करण्यासारखं
आहे. सुमारे
८१% दुखापती
पिरॅमिड
उतरवताना
झाल्याचं
त्यांच्या
निदर्शनास
आलं आहे.
मधल्या
थरातील
गोविंदांना
वरच्या थरातील
गोविंदा
त्यांच्यावर
पडून दुखापती
झाल्याचं
चित्र दिसत
आहे. केईएम
मध्ये उपचार
घेण्यासाठी
आलेल्यात
वरील थरातील
गोविंदा
मधल्या थरातील
गोविंदांवर
पडून (सुमारे
६६%) जखमी
झाले तर
३२% गोविंदा
वरून खाली
पडण्याने
जखमी झाले.
दोन
गोविंदा वरुन
तर पडलेच
पण त्यांच्यावर
इतरही पडल्यामुळे
ते जखमी
झाले. सुमारे
५९% गोविंदा
३० फूटापेक्षा
उंच दही
हंडी फोडताना
जखमी झाल्याचं
त्यांना
आढळलंय. मुरगळणं,
छोटी
जखम, ओरखडे
अशा किरकोळ
दुखापतींव्यतिरीक्त
यातील ४६
जणांना गंभीर
दुखापती
झाल्या होत्या.
त्यातील
१९ जणांची
हातापायाची
हाडं तुटली,
दहांची
डोकी फुटली,
तिघांच्या
बरगड्या, दोघांचे
मानेचे मणके
आणि एकाच्या
पाठीच्या
कण्याची हाडं
तुटली तर
एकाला पक्षाघात
झाला.
जितक्या
जास्त उंचीवर
हंडी तितक्या
जास्त प्रमाणात
अपघात होण्याची
शक्यता हे
सांगायला
आकडयांच्या
आधाराची गरज
नसावी. पण
तरी वरील
अभ्यासात
ही बाब
प्रकर्षानं
दिसून येत
आहे. आज
काल स्त्रियाही
दही हंडी
फोडण्यात
भाग घेत
असल्या तरी
मुख्यत्वेकरुन
हा खेळ
अद्याप तरी
पुरुषी आहे.
त्यामुळे
डॉक्टरांच्या
पहाणीत जखमी
झालेल्यात
पुरुषांचीच
संख्या लक्षणीय
असणं साहजिकच
आहे. विकिपिडीयातील
लेखात
म्हणल्याप्रमाणे
एक पथक
सुमारे तीन
दहीहंड्या
फोडते. मोठ्या
रकमेच्या
हंड्या फोडायला
वेळ घेतला
जातो, सायंकाळ
होऊन जाते.
तोवर
इतर ठिकाणी
खेळून गोविंदा
दमले-भागलेले
असतात, उजेडही
कमी होत
जातो. सहानंतर
होणाऱ्या
अपघातांचं
प्रमाण जास्त
असण्याची
ही कारणं
असू शकतात
असं या
लेखक डॉक्टर
मंडळींना
वाटतंय त्यात
तथ्य असावं.
पिरॅमिड
बनवण्यात
जितक्या
प्रमाणात
कौशल्य लागतं
तितकंच ते
उतरवतानाही
लागतं. पण
एकदा का
दहीहंडी
फोडण्यात
यश आलं
की त्या
पथकात चैतन्य
पसरतं आणि
त्यांच्यातली
एकाग्रता
हरपते, विवेकाला
खीळ बसते
आणि हीच वेळ
अपघातास
आमंत्रण देते
असं डॉक्टरांचं
म्हणणं आहे.
८१%
दुखापती
पिरॅमिड
उतरवताना
झाल्याचे
निष्कर्ष
हे अपघात
कमी करायचे
असतील तर
कुठे जास्त
लक्ष द्यायला
हवं हेच
सुचवतात.
या
हंड्यांची
उंची कमी
असावी आणि
दिवसा-उजेडी
हे खेळ
संपवावेत
हा डॉक्टरांचा
सल्ला कितपत
ऐकला जाईल
याबद्दल शंका
वाटावी अशीच
परिस्थिती
आहे पण
इतर बाबी
जसं शिरस्त्राण
घालणं, हाता-पायांना
पॅड्स बांधणं,
पिरॅमिडच्या
खाली मऊ
गादी असणं
आणि विशेषतः
पिरॅमिड
उतरवताना
एकाग्रता
हरवू न देणं
यात गोविंदा
पथकांनी
पुरेसं लक्ष
घातलं तरी
बरेच अपघात
कमी होतील
असं वाटतं.
प्रत्येक
खेळात आता
व्यावसायिकता
आली आहे,
येत
आहे आणि
ते काळानुसार
आवश्यकही
आहे. दहीहंडीसारख्या
अपघात प्रवण
खेळात हे
टाळण्यासाठी
घ्यायची
काळजी याला
अग्रक्रम
असायलाच हवा.
जन्माष्टमी
जवळ आली
आहे. सगळेच
गोविंदा
उत्कृष्ट
पिरॅमिडस्
करण्याच्या
तालमी करीत
असतील. वरील
बाबींमध्ये
त्यांनी लक्ष
घातलं तर
अपघातात जखमी
होण्याचं
प्रमाण बरंच
कमी होईल
आणि ती
दहीहंडी
सगळ्यांनाच
आनंददायक
अशी होईल.
२०१३
ची आणि
त्यापुढील
जन्माष्टमी
सगळ्या गोविंदा
पथकांना कमीत
कमी अपघाती
ठरतील अशी
आशा आपण
करुया.
Dear Sir,
उत्तर द्याहटवाWonderful and nice analysis !
Very interesting study. Protective measures such as wearing helmets, hand and legs/knee pads needs to be taken. Interested parties and Governments should make this mandatory.
उत्तर द्याहटवाCongratulations for the site and the articles.
उत्तर द्याहटवाInformative and timely. Need followup.
Keep it up.-Suneela
नमस्कार. हा लेख बोध घेण्यासारखा आहे । आणि आता दहीहांडी खेळनारया गोविंदनी आपण व्यक्त केलेले विचार आचरनात आणून खेलले तर ही जन्माष्टमी त्याना व आम्हा सर्वना आनंदाची आणि सुखरूपतेचि होईल। जन्माष्टमी सगळ्या गोविंदा पथकांना कमीत कमी अपघाती ठरतील अशी आशा आपण करुया. हीच सदिछा
उत्तर द्याहटवा