आरोग्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आरोग्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ मार्च, २०१४

अनिष्ट परिणामांशिवाय रक्ताची गुठळी फोडणारं अनोखं औषध / A novel clot-buster without side-effects

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने (हृदयस्नायूंना रक्तपुरवठा करण्यात अडथळा आल्याने) भारतात दरवर्षी सुमारे २५ लाख मृत्यू होतात. हा दर सतत वाढता असल्याचंही आढळून आलं आहे. बदलतं राहणीमान, बैठी कार्यपध्दती, आहारातले बदल यामुळे हे असं होत आहे. हृदयविकार म्हणजे नेमकं काय? हृदयावर उठून दिसणार्‍या हृद् रोहिण्या हृदयस्नायूंना प्राणवायू आणि अन्नद्रव्याचा पुरवठा करतात. या रोहिण्यांच्या आतल्या पृष्ठभागावर चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ यांचं एक जाड किटण जमा होतं. हे किटण मग रक्तातल्या इतर घटकांना आणि कोशिकांनाही आकृष्ट करुन घेतं आणि गुठळ्या निर्माण होतात. मग या रोहिण्यांतून हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. याला मग हृदयविकाराचा झटका येणं आणि याच कारणामुळे जेव्हा मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होतो तेव्हा त्याला आघात (स्ट्रोक येणं) असं म्हटलं जातं. ही किटण जमण्याची प्रक्रिया खरं म्हणजे प्रत्येकाच्या बालपणापासूनच होत असते.

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

पोलिओचे उच्चाटन: भारताचे योगदान / India's contribution to polio elimination

भारतात शेवटच्या पोलिओच्या रुग्णाची नोंद १३ जानेवारी २०११ रोजी झाली. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ होणार्‍या देशांच्या यादीतून नंतर आणखी रुग्णांची नोंद होतेय का याची वर्षभर वाट पाहून २०१२ साली वगळले. आता तीन वर्षांअखेर (१३ जानेवारीला २०१४) आणखी रुग्णांची नोंद न झाल्यामुळे यासंबंधी अधिकृत प्रमाणपत्र मिळण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संसर्गजन्य रोगांवर मात ही मानवाच्या नैपुण्याची साक्षच. काही वर्षांपूर्वी देवीच्या रोगावर अशीच मात करण्यात भारत यशस्वी झाला होता. बुळकांड्या/ढेंडाळ्या (rinderpest) या गुरांमध्ये होणार्‍या संसर्गजन्य रोगापासूनही आपण मुक्त झालो याची फारशी माहिती सामान्य वाचकांना नसण्याची शक्यता आहे. पोलिओ हा बेफामपणे पसरणार्‍या पोलिओ विषाणूंमुळे (wild poliovirus - WPV) होतो. या विषाणुंचे तीन प्रकार आहेतः WPV-१, WPV-२ आणि WPV-३.

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

सुई शिवाय इंजेक्शन / Needleless drug delivery

स्थळ सरकारी रुग्णालय. वेळ सकाळची. ठराविक वेळेत इथे बालकांना लस दिली जाते. त्यामुळे गर्दी. सगळ्या माता आपआपल्या बाळांना घेऊन आपला नंबर कधी लागतोय याची वाट पहात बसलेल्या आहेत. तसं एकाच वेळेस अनेक बालकांना लस दिली जातेय पण गर्दीच इतकी आहे की थोडा कोलाहल माजलाच आहे. सगळीच बालकं त्यांना सुई टोचल्यावर कळवळून रडताहेत. तर त्यांचा आवाज ऐकून रांगेतल्या इतर बाळांच्या हळुवार मनालाही कसली तरी अनामिक भीती वाटतेय आणि तेही आपला आवाज त्यांच्या आवाजात मिसळताहेत. त्यांना या संवेदनाशून्य जगाचा अद्याप परिचय व्हायचा आहे ना! परिचारिका मात्र निर्विकारपणे एका पाठोपाठ एक बाळांना इंजेक्शनद्वारे नाहीतर तोंडावाटे लस देण्यात गर्क आहेत. बाळांचं रडणं त्यांना सवयीचंच झालं आहे. बाळांच्या आयांनाही बाळाला टोचल्यावर त्यांना दुखलं म्हणून वाईट वाटतंय पण हे होणारंच हे सगळ्यांनीच अध्याहृत धरलंय. पिढ्यानपिढ्या हेच चाललंय. त्यात विशेष ते काय? परिचारिकांना आणि आयांना त्यात विशेष असं वाटत नसलं तरी वैज्ञानिकांना मात्र तसं वाटत नाही. सुई शिवाय इंजेक्शन देता आलं तर किती मजा येईल नां? त्याच खटपटीत ते आहेत आणि आपण या लेखात त्यांच्या ह्या प्रयत्नाचा आढावा घेणार आहोत.

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

गोविंदाSS, सावध रे! / Dahi handi pyramid participants, please be cautious


दही हंडी - जय भारत सेवा संघ, चित्र आभार: विकीपिडीया
दही हंडी फोडण्यासाठी पिरॅमिड्स बांधताना गोविंदांनी घ्यायची काळजी: अपघातांच्या अभ्यासातून केलेले निदान 

पुराणकथांमधून समाजाला जगण्याचं सार गोष्टीरुपात शिकवलं जात असे. त्यामुळे ऐकणारा आपल्या कुवतीनुसार त्यातून अर्थ काढून रमत असे. सण, उत्सव यांचा हेतू या साराची उजळणी करण्यासाठी आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दही चोरण्याची कथाही अशीच आपल्याला समाजात कसं जगावं याचं दर्शन घडवते. कृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात जरी झाला असला तरी त्याचं बालपण गोकुळात गोपींच्या सान्निध्यात त्यांच्याशी खेळत, त्यांच्या खोड्या काढत गेलं. त्यांनी शिंक्याला बांधलेलं दही, लोणी चोरून खाणं ही गोष्ट रंगवून सांगितली जाते. इतक्या उंचावर बांधलेलं दही हा एकटा खाणार तरी कसा? तर त्याच्या सवंगड्यांना बरोबर घेऊन. एकमेकाच्या खांद्यावर उभं रहात ते दह्यापर्यंत पोहोचत आणि आनंद लुटत. सवंगडी वेगवेगळ्या जातीतले, परिवारातले. ध्येय साध्य करायचं असेल तर त्यांच्यात भेदभाव करून चालणार नाही ही यातून मिळणारी शिकवण. तसंच लोणी, दही हे स्निग्ध पदार्थ. शिंक्याला बांधलेल्या या पदार्थांचा हंडी फोडल्यावर सगळ्यांच्या अंगावर वर्षाव होई आणि एकमेकात स्नेह कसा निर्माण करायचा हे यातून कळे.