भूगर्भशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भूगर्भशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४

वाळवी: निसर्गातले धातूकर्मी अभियंते / Termites: Metallurgical engineers in nature

वाळवी म्हणलं की शहरी माणसाच्या अंगावर काटा उभा रहातो. ती एखाद्या वस्तूला लागली की त्या वस्तूचा भुगा करुनच पुढे जाणार हे सत्य. शक्यतो दमट जागा तिच्या खास आवडत्या. इमारतीच्या पायात, पुस्तकांना, लाकडी सामानाला, कापडी जिन्नस, गाद्या, कशालाही ती लागते आणि थोडक्या वेळात त्या वस्तूचं होत्याचं नव्हतं करुन टाकते. जमिनीत तर ती असतेच. जंगलात, ओसाड जागी मातीची उंचच उंच वारूळं करुन त्यात निवास करणं हा तर त्यांचा हक्कच!

माणसाचा हा शत्रू असला तरी वाळवीला त्याने आपल्या फायद्यासाठी राबवलं आहे. अगदी पुराणकाळापासून. वराहमिहिराने बृहत संहितेत विहिर खणायची असेल तर वाळवीचं वारूळ असलेली जागा शोधून काढा असा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांचा भक्ष्य म्हणूनही वापर केला जातो. भारतातही ओडिशा, झारखंड राज्यातले आदिवासी वाळवीच्या मुंग्या (आपण त्यांना मुंग्या म्हणत असलो तरी त्यांचं आणि मुंगीचं कुळ वेगळं असतं) मोठ्या संख्येने एका ठिकाणी असतात तेव्हा त्यांना पकडून, भाजून नुसतंच किंवा भाताबरोबर खातात. वाळवी शक्तीदात्री आहे. अगदी मासळीतून मिळणार्‍या उश्मांकापेक्षा. प्रत्येक १०० ग्रॅम वाळवीत ६१३ उष्मांक मिळतात तर मासळीमध्ये १७० (Indian Journal of Traditional Knowledge 8(4); 2009; 485-494). यावरुन तिच्या उपयुक्ततेची कल्पना यावी.

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३

धरणीच्या गर्भातील ऊब: उष्ण झरे / Hot Springs


तुरलचा उष्ण झरा छायाचित्र आभार: डॉ. डी. व्ही. रेड्डी,
वैज्ञानिक, एनजीआरआय
उष्ण ऱ्यांच्या पाण्याबद्दल तसे आपण सगळेच ऐकून असतो. काही ऱ्यांचं पौराणिक कथांमधे वर्णन येतं. तिथे ॠषीमुनींचं वास्तव्य होतं, म्हणून आज ती ठिकाणं तीर्थक्षेत्रं म्हणूनही प्रसिध्द आहेत. या पाण्याचे गुणधर्म नेहमीच्या वापरात येणाऱ्या पाण्यापेक्षा वेगळे असतात ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली माहिती जरी सगळ्यांना असली तरी ऱ्या जणांना हे कशामुळे होतं हे समजलेलं नसतं. तरी अशा ठिकाणी बरीच गर्दी असते. या गर्दीतले काही जण श्रध्देने व्याधींवर उपाय म्हणून, काही केवळ पुण्यसंचय करण्यासाठी तर काही निखळ आनंदासाठीही यात स्नान करतात. भूजलाची आपल्याला ओळख म्हणजे विहिरीतलं पाणी. गेली काही वर्ष शहरी माणसांना नळातून येणाऱ्या पाण्याचीच इतकी सवय झाली आहे की विहिरी जवळ-जवळ विसरल्याच होत्या. पण आता दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची पुन्हा ओळख होत आहे म्हणलं तरी चालेल. तर मग या विहिरींमधील ऱ्यातून येणाऱ्या पाण्यात आणि उष्ण ऱ्याच्या पाण्यात काय फरक आहे? ढोबळ फरक सांगायचा तर विहिरीतील झरे हे जमिनीपासून थोड्याच खोलीवर असतात तर उष्ण ऱ्यांचा स्त्रोत जमिनीत खूप खोल असतो आणि हे नैसर्गिकरित्या जमिनीच्या भेगांमधून वर येतात, अर्थात हे ठिकाण ज्वालामुखीच्या क्षेत्रातलं नसेल तेव्हा. कारण तिथे लाव्हाच द्रवाच्या रुपात बाहेर पडत असतो. उष्ण झरे पृथ्वीवर ऱ्या ठिकाणी आहेत. भूभागाचं तपमान जसजसं खोल जाऊ तसतसं वाढत जातं. त्यामुळे पाणी जितकं जमिनीत खोलवर मुरतं तितकी त्याची उष्णता वाढत जाते आणि हेच पाणी जेव्हा भूपृष्ठावर येतं तेव्हा तिथली उष्णता घेऊन बाहेर पडतं. उष्ण पाणी या ऱ्यातून बाहेर पडण्याचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. हा प्रवाह अगदी झुळुझुळु वहाणाऱ्या पाण्यापासून ते अगदी नदीच्या प्रवाहाएवढा असू शकतो. काही ठिकाणी तर हे पाणी मोठ्या दाबाखाली कारंजासारखं जमिनीतून बाहेर पडत असतं.