कच्छ हा गुजरातमधील भारताच्या पश्चिम टोकाला असलेला एक जिल्हा. भारतातील जिल्ह्यांमध्ये आकाराने सर्वात मोठा - ४६ हजार चौरस कि.मी. व्यापणारा पण सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. भारताची पूर्वोत्तर राज्ये, जम्मू-काश्मीर आणि जैसलमेरनंतर कमी लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांमध्ये याचाच क्रमांक लागतो - दर चौ.कि.मी. मागे केवळ ४६ लोकसंख्या असलेला. गुजरातेतील सुरतमध्ये ही लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. मागे १४४० तर मुंबईत ४८ हजार आहे यावरुन कच्छमध्ये किती किरकोळ आहे याची कल्पना यावी. 'कच्छचं रण' या नावानं ओळखल्या जाणार्या या जिल्ह्यातला भाग म्हणजे एक मोठं कोडंच आहे म्हणाना! 'कच्छ' ह्या शब्दाचा अर्थ आलटून-पालटून दलदलीचा आणि कोरडा होणारा भूभाग असं विकिपिडीयात म्हणलंय (http://en.wikipedia.org/wiki/Kutch_District). तर 'रण' या शब्दाचा उगम संस्कृत शब्द 'ईरिण' यातून झाला असावा ज्याचा अर्थ ओसाड प्रदेश, नापीक जमीन असा होतो. ३०० कि.मी. पूर्व-पश्चिम आणि काही ठिकाणी १५० कि.मी. दक्षिणोत्तर पसरलेला हा भूभाग समुद्रसपाटीपासून म्हणण्यापुरत्याच उंचीवर आहे. यातल्या मधल्या उंच भूभागामुळे याचे दोन भाग झाले आहेतः उत्तरेचं 'थोरलं रण' (Great Rann) - सुमारे १८००० चौ.कि.मी. आणि आग्नेय (दपू) दिशेला 'धाकटं रण' (Little Rann) - सुमारे ५००० चौ.कि.मी. कच्छ जिल्ह्याचा बराचसा भाग हे रण व्यापतात. थोरलं रण अरबी समुद्राला कोरी खाडीनं जोडलं आहे तर धाकटं रण कच्छच्या आखाताला. पावसाळ्यात रणाचा बराचसा भाग पाण्याखाली रहातो तर इतर ऋतुत (नोव्हेंबर ते मे) मात्र ते बहुधा कोरडेच असते.
ऋतू_बदल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
ऋतू_बदल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४
शनिवार, १ जून, २०१३
निवड: सतीच्या वाणाची की सुधारित वाणाची? / Choice: Hunger or GM crops
सुधारित वाणांचा वापर करून भुकेवर मात करायची की उपाशी मरायचं यावर दोन्ही अंगानी केलेला उहापोह
वनस्पतींचं नवं लाभदायक वाण तयार करण्याचं तंत्र माणसानं आत्मसात करून शेकडो वर्ष झाली. दोन जाती/प्रजातींतून त्यांच्यातल्या चांगल्या गुणांसाठी त्यांचं प्रजनन करुन नवं वाण निर्माण करत माणसानं प्रगती साधली. अधिक धान्य देणारं, किडीला समर्थपणे तोंड देणारं सुधारित वाण संशोधनातून निर्माण होत राहिलं. तसं पाहिलं तर अशा प्रजननामुळे आता इतके नवे वाण वापरात आहेत की मूळ वाणाचं बियाणंच कुठे मिळू नये! वनस्पतीतील जनुकंच विशिष्ट गुणधर्म ठरवतात हे यातून मानवाला कळलं होतं.
लेबल:
ऋतू_बदल,
कृषि,
जागतिक_तपमान_वाढ,
विज्ञान लेख,
agriculture,
climate_change,
global_warming,
GM_crops,
India,
Marathi
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)